एमपीसी न्यूज – सोमवारी गर्दीच्या वेळी रुळावर पडलेल्या 50 वर्षीय महिलेला वाचवण्यासाठी नवी मुंबईत लोकल ट्रेन मागे (रिव्हर्स) घेण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ठाण्याला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत असताना एक प्रवासी पडल्याची घटना बेलापूर स्टेशनवर सकाळी 10 च्या सुमारास घडली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले की, “बेलापूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील पनवेल-ठाणे गाडी या महिलेचा जीव वाचवण्यासाठी मागे घेण्यात आली आणि नंतर तिला जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले,” असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले.
Mumbai Rain : मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शाळा बंद
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एक जखमी महिला रुळावर पडली असून गर्दी असलेल्या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन हळू हळू मागे जाताना दिसत आहे.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेन तिच्या अंगावरून गेल्याने महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
मुंबईत मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवेला फटका बसला असून गाड्या उशिराने धावत आहेत.
रुळांवर पाणी साचल्याने वडाळा ते मानखुर्द स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती.