एमपीसी न्यूज – मुंबईत काल रात्रीपासून सुरु (Mumbai )असलेल्या पावसामुळे मुंबईत सर्वत्र पाणि साचले आहे. या पावसामुळे मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून मुंबई लोकलला फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
मुंबईतील काही भागात सहा तासात सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहतूक कोंडी झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील बैठक झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्ती विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत मुंबई आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा, त्यांचे कॅबिनेट सहकारी गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आणि वरिष्ठ IAS अधिकारी चहल उपस्तित होते. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले असून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि प्रभाग स्तरावरील कर्मचारी मैदानात आहेत. मुंबई महापालिकेने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आपत्कालीन मदतीसाठी त्याच्या नियंत्रण क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन आहे.
Pimpri : महापालिकेतर्फे ‘सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धा’
मुंबईत आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांमध्ये, बेट शहरात सरासरी 115.63 मिमी पावसाची नोंद झाली असून मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनुक्रमे 168.68 मिमी आणि 165.93 मिमी पावसाची नोंद झाली आहे.पूर्व मुंबईत गोवंडीमध्ये सर्वाधिक 315.6 मिमी पावसाची नोंद झाली, पवईमध्ये 314.5 मिमी, तर पश्चिम भागात अंधेरीतील मलपा डोंगरीमध्ये 292.2 मिमी पावसाची नोंद झाली, चकाला भागात 278.2 मिमी पावसाची नोंद झाली.बेट शहरात, प्रतीक्षानगरमध्ये 220.2मिमी पावसाची नोंद झाली असून शिवडी कोळीवाडा येथे 185.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.