एमपीसी न्यूज – पुण्यात झिका व्हायरचा संसर्ग झपाट्याने वाढत असून आता रुग्ण संख्या 11 वर पोहचली आहे, यापैकी पाच गर्भवती आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
एरंडवणे या एकाच भागात झिका चे चार रुग्ण आढळले होते. त्यातील दोन गर्भवती महिला आहेत. पाठोपाठ मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात दोन रुग्णांना झिका चा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यामध्येही एक गर्भवतीची नोंद झाली. डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बुद्रूक या परिसरातही एका पाठोपाठ एक नवीन रुग्ण आढळले. त्यातील पाषाण आणि आंबेगाव बुद्रुकमधील दोन रुग्ण गर्भवती आहेत. त्यामुळे झिका चा संसर्ग झालेल्या गर्भवतींची संख्या.
Train Cancelled : मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे रद्द
पाचपर्यंत वाढली आहे. आता कर्वेनगर आणि खराडी परिसरात दोन जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे. कर्वेनगरमधील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 42 वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ताप येत होता. त्यामुळे रुग्णालयाने तिच्या रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल नुकताच मिळाला. त्यातून रुग्णाला झिका चा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी डासांपासून संरक्षण करावे असे आवाहान करण्यात आले आहे.