Explore

Search
Close this search box.

Search

November 15, 2024 12:03 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Pimpri : संविधान भवन उभारणीसाठी सल्लागार नियुक्ती प्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या (Pimpri )वतीने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता जगातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी संविधान भवन बाबत सकारात्मक चर्चा झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतीय संविधानासह अन्य देशाच्या संविधानांचा अभ्यास सर्वसामान्य नागरिकांना करता यावा. या करिता पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण  ‘‘संविधान भवन’’ प्रस्तावित केले आहे. संविधान साक्षरता या हेतुने हाती घेतलेल्या या कामाला गती द्यावी, असे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने संविधान भवन उभारणेकामी सल्लागार नियुक्तीची कार्यवाही सुरु केली आहे.

Pune rain : पुढील 3 तासांत पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची दाट शक्यता

सल्लागार नियुक्तीसाठी दि. 9 ते 18 जुलै 2024 पर्यंत वास्तुविशारद नेमणूक करणे व त्याकामी दरपत्रक मागवण्यासाठी कोटेशन नोटीस प्रसिद्ध केली आहे. ई-कोटेशन सीलबंद दरपत्रक मागवण्यात आले आहे. सदर नोटीस महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कुठे होणार संविधान भवन?

तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये सदर संविधान भवन व विपश्यना केंद्र प्रस्तावित असून, प्राधिकरणाच्या सभा क्र. 337 दि. 22 जानेवारी 2019 च्या विषय क्रमांक 4 अन्वये ठराव मंजुर केला आहे. त्यानुसार, पेठ क्रमांक 11 मध्ये ‘‘संविधान भवन व विपश्यना केंद्र ’’ उभारणीसाठी मान्यता दिली आहे. सदर दोन्ही प्रकल्प स्वतंत्रपणे विकसित करण्याची आवश्यकता आहे. प्रकल्प सल्लागार नियुक्ती व तज्ञ समितीची नेमणूक करण्यासह प्राधिकरण सभेची मान्यताही मिळाली आहे. त्याअनुशंगाने, ‘पीएमआरडीए’ प्रशासन पेठ क्रमांक 11 मधील संबंधित जागा पीसीएमसीला हस्तांतरीत करणार आहे. या ठिकाणी संविधान भवन, विपश्यना केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी असे नियोजन करण्यात येणार आहे.

संविधान भवन उभारणीसाठी ‘पीएमआरडीए’कडून पेठ क्रमांक 11 मधील जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया आणि या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सल्लागार नियुक्तीनंतर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

भारतीय संविधानाबाबतची संपूर्ण माहिती या संविधान भवनात असणार आहे. त्याशिवाय, संविधान निर्मितीबाबतचा इतिहास आणि संविधान निर्मितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले योगदान, भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती येथे दिली जाणार आहे. जगातील पहिले संविधान भवन आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये साकारात आहे. याचा पिंपरी-चिंचवडकर म्हणून आम्हाला विशेष अभिमान वाटतो.
महेश लांडगे,
आमदार, भोसरी

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर