Explore

Search
Close this search box.

Search

February 17, 2025 10:54 pm

MPC news

Pune news : विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शैक्षणिक प्रमाणपत्रे

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कागदविरहित प्रक्रियेकडे पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता ऑनलाइन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळणार आहेत. विद्यापीठात शुक्रवारी शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठीच्या ‘ऑनलाइन पोर्टल’चे अनावरण करण्यात आले. या पोर्टलचे अनावरण विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अधिसभा सदस्य श्री. राहुल पाखरे, विद्यावाणीचे माजी संचालक श्री. आनंद देशमुख, पदवी प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव श्री. ज्ञानेश्वर साळुंके, श्री. बाळासाहेब आंत्रे, श्री. विक्रम संगर, श्री. तुषार बेलेकर यांच्यासह ट्रॉन्सक्रिप्ट विभागातील सर्व सहकारी(Pune news) उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातीन विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशात उच्च शिक्षणासाठी जात असतात. मात्र परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना तसेच पारपत्रासाठी (व्हिसा) अर्ज करताना विद्यार्थ्यांना ट्रॉन्सक्रिप्ट प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्रे अनिवार्य असतात. ज्यात ट्रॉन्सक्रिप्ट प्रमाणपत्र, रँक प्रमाणपत्र, मिडियम प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, दुय्यम शैक्षणिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. आतापर्यंत ही कागदपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडे (स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटर) सादर करावी(Pune news) लागायची.

Pune rain : पुढील 3 तासांत पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची दाट शक्यता

या प्रक्रियेत बराच वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. मात्र आता ही संपूर्ण प्रक्रिया या पोर्टलद्वारे ऑनलाइन आणि कागदविरहित पद्धतीने राबविण्यात येणार आहे. यांतर्गत विद्यापीठाच्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा विभागाकडून त्या संदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल आणि विद्यार्थ्यांना घरबसल्या ही प्रमाणपत्रे मिळतील. विशेष म्हणजे या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यातील अपडेट मॅसेज आणि ईमेलद्वारे मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जाचे स्टेटस तपासता येणार आहे. विद्यापीठाच्या एज्युटेक फाऊंडेशनने निर्माण केलेल्या या https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर