एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील अँड. पु.वा. परांजपे विद्यालयातील माजी विद्यार्थी सन 2000 – 2001 या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम शनिवार (दि.6) विद्यालयात च पार पडला.
त्याप्रसंगी मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी सरस्वती पूजन केले. प्रत्येक विद्यार्थ्याला 200 पानी सहा व 100 पानी सहा वह्या तसेच कंपास पेटी ,दोन पेन असे साहित्य प्रदान करण्यात आले. विद्यालयातील एकूण 45 विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रसाद सावंत, अभिजीत चौधरी, तुषार उबाळे, गौरव काळकर ,सुजित निंबळे, गणेश पडवळ, हर्षदा पडवळ, प्रशांत ठोके ,आशुतोष हेंद्रे ,गोकुळ किरवे, गिरीश चौरे इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Pimpri : छत्र्या, रेनकोटच्या दरांमध्ये वाढ
शाळेत झालेल्या विविध सुधारणां विषयी सांगून , शालेय विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे पालकांची जास्त ओढ सेमीच्या वर्गांकडे असून प्रत्येक सेमी च्या वर्गात 80 च्या वर पटसंख्या झालेली आहे हे प्रास्ताविकेतून पांडुरंग पोटे सरांनी सांगितले .तर माजी विद्यार्थी गणेश पडवळ याने शाळेसाठी तुम्ही विद्यार्थ्यांनी देखील मोठे झाल्यावर आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून तुम्हीही सामाजिक कार्यात सहभागी.