एमपीसी न्यूज – मुंबई परिसरात रविवार (दि. 7) पासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पुणे-मुंबई लोहमार्गावरील कांदिवली-टिटवाळा, कल्याण-कसारा या विभागात मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळांवर पाणी आले आहे. त्यामुळे पुणे मुंबई दरम्यानच्या चार रेल्वे सोमवारी (दि. 8) रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या रेल्वे –
- 11010 पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस
- 12124 पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस
- 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
- 12128 पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
पुण्याकडे येणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या रेल्वे –
- 11009 मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस
- 12127 मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
- 12123 मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
- 11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस