एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी परिसरातील (Bhosari)मेकमोर इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारातून अनोळखी व्यक्तींनी तीन झाडे तोडली. ती झाडे एका पिकअप मध्ये भरून ठेवली. ही घटना 27 जून रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
महापालिकेचे उद्यान सहायक सुहास सामसे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त यानुसार मेकमोर कंपनीचे मालक आणि पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vasant More : वसंत मोरेंची घरवापसी ,हाती बांधले शिवबंधन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेकमोर इंडस्ट्रीज कंपनीच्या आतील बाजूला मोकळ्या जागेत असलेली कडुलिंब, रामफळ आणि जांभूळ अशी तीन झाडे विनापरवाना जमिनीपासून तोडली. त्याची लाकडे पिकअप मध्ये भरून ठेवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पालिकेकडून याबाबत कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.