एमपीसी न्यूज – वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शहापूर येथून अटक करण्यात आली असून या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच या आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांना देखील पोलिसांनी(Breaking news) अटक केली आहे.
मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या निष्पाप महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो लगेचच फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली असून मिहीर शाहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.