कॅरम असोसिएशन ऑफ पुणे मानांकित जिल्हास्तरीय भव्य दुहेरी कॅरम स्पर्धेमध्ये 240 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पुरुष गटामध्ये 130 खेळाडू, जेष्ठ नागरिक गटामध्ये 90 खेळाडू व महिला गटामध्ये 20 महिलांनी समावेश घेतला होता.यामध्ये पुरुष गटामध्ये अंतिम सामना वर्ल्ड चॅम्पियन योगेश परदेशी व राष्ट्रीय खेळाडू रहीम खान ह्या जोडीने शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनिल मुंढे व राष्ट्रीय खेळाडू गणेश तावरे ह्या जोडी वर अत्यंत चुरशीच्या लढतीत 17-16, 14-25 व 15 -11 असा रोमहर्षक विजय मिळवत सर्व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

याबरोबरच महिला गटामध्ये सुद्धा अत्यंत अटीतटीचा अंतिम सामना होऊन राष्ट्रीय खेळाडू तनया पाटील व अनन्या शेलार ह्या जोडीने(Chinchwad) राष्ट्रीय खेळाडू श्रुती वेळेकर व जयश्री सुदर्सनम ह्या जोडीला 18-05, 10-15 व 22-06 अशा 3 सेट मध्ये उत्कृष्ट खेळ करत दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. ह्या स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिक गटसुद्धा अत्यंत उत्साहात सहभागी झाला होता. या गटामध्ये अंतिम सामना रझाक शेख व अमृत परदेशी ह्या जोडीने विष्णू भुते व राम तायल ह्या जोडीवर 24-03 व 19-16 अशा सरळ 2 सेट मध्ये विजय मिळवत आपला उत्साह साजरा केला.या बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन वाळुंज व कानवडे यांनी केले.