एमपीसी न्यूज -भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची आज दि.(9 जुलै) रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अधिकृत घोषणा केली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात(Cricket) आली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे की, गौतम गंभीर यांचे भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआय स्वागत करत आहे. आधुनिक क्रिकेट आताच्या काळात प्रचंड वेगानं विकसित होत असून गौतम गंभीर या बदलांचा साक्षीदार आहे. गौतम गंभीर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असून त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे.
गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता रायडर्स संघाने गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपद पटकावले होते.गौतम गंभीर यांचा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून साल 2027 पर्यंत कार्यकाल निश्चित करण्यात आला आहे.