एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 200 कोटी रुपये (PCMC)मूल्यांच्या प्रस्तावित हरित महापालिका कर्ज रोख्यांना (ग्रीन म्युनिसिपल बाँड्स) क्रिसिल (CRISIL) या प्रतिष्ठित संस्थेकडून एए प्लस (AA+) स्थिर पतमानांकन (stable rating) मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेने रोख्यांच्या माध्यमातून कर्ज उभारणीच्या प्रक्रियेतील एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या अनुषंगाने पर्यावरण तसेच हवामान बदल यामध्ये सकारात्मक योगदान देणाऱ्या प्रकल्पांसाठी हरित कर्ज रोखे जारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Lonavala: भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी – सुनिल शेळके
त्यानुषंगाने हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून हरित रोख्यांमध्ये समावेश असणा-या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उभारणे आवश्यक असल्याने महापालिकेच्या वतीने हरित रोख्यांची उभारणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या या प्रस्तावास प्रतिष्ठित क्रिसिल (सीआरआयएसआयएल) कडून एए प्लस स्थिर पतमानांकन मिळाले असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.
महापालिकेच्या प्रस्तावित हरित रोख्यांना एए प्लस स्थिर पतमानांकन मिळणे हे पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचे आणि महापालिकेच्या चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठीच्या आमच्या वचनबद्धतेचे सूचक आहे. शहरातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक तसेच आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून हरित कर्ज रोख्यांमधून उभारलेला निधी अधिक शाश्वत पिंपरी चिंचवडची संकल्पना साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास देखील आयुक्त सिंह यांनी व्यक्त केला.
हरित कर्ज रोख्यांमधून उभारलेला निधीतून महापालिका क्षेत्रातील गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक जंक्शन हा टेल्को रस्ता, हरित सेतूचे अ क्षेत्रीय कार्यालय, निगडी प्राधिकरण प्रभाग क्र.15 या परिसरातील काम आणि शहरातील नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टेशन यांसह महापालिकेला आवश्यक वाटणारे हरित प्रकल्प याद्वारे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे, शहरात सायकलिंग लेन विकसित करणे, पादचाऱ्यांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, शहरातील हवेची गुणवत्ता वाढवणे हा देखील उद्देश यातून साध्य होणार आहे.
महापालिकेच्या हरित कर्ज रोख्यांसाठी सी.आर.आय.एस.आय.एल. कडून एए प्लस मिळालेल्या स्थिर पतमानांकनाचे महत्त्व
उच्च पतमानांकन योग्यता: एए प्लस स्थिर पतमानांकन मजबूत आर्थिक स्थिती आणि डीफॉल्टचा धोका कमी दर्शवते.
गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास उंचावतो: हे पतमानांकन गुंतवणुकदारांना महापालिकेच्या निधीचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन आणि परतफेड करण्याच्या क्षमतेची खात्री देते, ज्यामुळे त्यांची गुंतवणूक करण्याची इच्छा वाढते.
कर्ज घेण्याचा खर्च कमी: उच्च पतमानंकनामुळे अनेकदा रोख्यांवरील व्याजदर कमी होतात, ज्यामुळे महापालिकेसाठी कर्ज घेण्याचा एकूण खर्च कमी होतो.
शाश्वततेसाठी सहाय्य: या हरित रोख्यांद्वारे उभारलेल्या निधीचा उपयोग पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी करण्यात येतो.