एमपीसी न्यूज – अवघ्या 100 दिवसात 1000 टक्के परतावा(Punavale) मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 96 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 2 एप्रिल ते 8 मे या कालावधीत पुनावळे येथे घडला.
याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पारेख ध्रुव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूचे 10 रुग्ण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पारेख ध्रुव याने फिर्यादीला सोशल मिडियावरून संपर्क केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अवघ्या 100 दिवसात तब्बल 1000 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून 96 लाख 57 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.