एमपीसी न्यूज – नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू (Pune)असलेल्या हॉकी पुणे लीग 2024-25मध्ये मंगळवारी वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागात क्रीडा प्रबोधिनी संघांनी दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकत दिवस गाजवला.
कनिष्ठ विभागात क्रीडा प्रबोधिनी ‘ब’ संघाने पीसीएमसी क्लबला 8-3 अशा हरवून चौथा विजय नोंदविला. कार्तिक पाठारेचे (8वा, 20वा, 24वा, 34वा, 44वा, 59वा) सहा गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
या विजयासह क्रीडा प्रबोधिनीने त्यांची एकूण गुणसंख्या 12वर नेली. ब गटात अव्वल स्थान पटकावून त्यांनी दिमाखात उपांत्य फेरी निश्चित केली.
दरम्यान, अ गटात फ्रेंड्स युनियन (4 विजयांसह 12 गुण) आणि पूना हॉकी अकॅडमी संघांनीही (9 गुण, 3 विजय, 1 पराभव) अंतिम 4 संघांमध्ये स्थान मिळवले.
कार्तिक पाठारेच्या एकहाती सर्वोत्तम कामगिरीव्यतिरिक्त, सूरज शुक्ला (36 वे) आणि राजरत्न कांबळेने (41 वे) क्रीडा प्रबोधिनी ‘ब’ संघासाठी गोल केले.
पीसीएमसी क्लबकडून (आनंद गायकवाड (29वे-पीसी), वृषभ अवध (47वे) आणि व्यंकटेश रेड्डी (50वे-पीसी) यांनी गोल केले.
वरिष्ठ विभागात, क्रीडा प्रबोधिनीने तळाला असलेल्या पीसीएमसी अकॅडमीवर 12-3 अशा फरकाने मात केली.
धैर्यशील जाधवचे (11वा, 45वा, 46वा, 53वा, 22वा) हॅट्ट्रिकसह पाच गोल, व्यंकटेश केंचे याचे (6वा, 40वा, 32वा, 58वा) चार गोल त्यांच्या मोठ्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.कुणाल दमल (चौथा), सचिन राजगुडे (36वे) आणि सचिन कोळेकरने (37वे) प्रत्येकी एक गोल करताना डझनभर गोल करण्यात खारीचा वाटा उचलला.
Talegaon : मायमर हॉस्पिटल परिसरातून चंदनाचे झाड चोरीला
पीसीएमसी अकॅडमीकडून गोल करण्यात अर्जुन हरगुडे (30वा, 48वा) आणि शंकर कुसले (12वा) यांना यश आले.
निकाल –
वरिष्ठ विभाग
क्रीडा प्रबोधिनी:12(कुणाल दमल 4वा; व्यंकटेश केंचे 6वे, 40वे, 32वे, 58वे; धैर्यशील जाधव 11वे, 45वे, 46वे, 53वे, 22वे; सचिन राजगुडे 36वे; सचिन कोळेकर 37वे) विजयी वि. पीसीएमसी अकॅडमी: 3(शंकर कुसळे 12वे, अर्जुन हरगुडे 30वा, 48वा). हाफटाईम: 4-2
कनिष्ठ विभाग
ब गट: क्रीडा प्रबोधिनी ’ब’: 8(कार्तिक पठारे 8वा, 20वा, 24वा, 34वा, 44वा, 59वा; सूरज शुक्ला 36वा; राजरत्न कांबळे 41वा) विजयी वि. पीसीएमसी क्लब: 3(आनंद गायकवाड 29वा-पीसी; वृषभ अवध 47वे; वेंकटेश रेड्डी 50वा