Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 7:32 pm

MPC news

Ravet: बेकायदेशीर कॉफी शॉप मध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे; कॉफी शॉप चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  बेकायदेशीरपणे कॉफी शॉप चालवून त्यामध्ये तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा (Ravet)उपलब्ध करून दिल्या प्रकरणी कॉफी शॉप मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 8) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास रावेत येथे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली.

कॅफे चालक धीरज प्रकाश मोहिते (वय 22, रा. वाकड), कॅफे मालक 34 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार संगीता जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ शिबिरासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लव बर्ड्स कॅफे शॉपचा कोणताही परवाना नसताना लव बर्ड्स कॉफी शॉपचा बोर्ड लावला. त्यामध्ये खाद्यपदार्थ विक्री करण्याच्या सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई करत कॅफे चालक आणि मालकावर गुन्हा नोंदवला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर