Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 8:19 am

MPC news

Red Alert : मुंबई-कोकणासह सातारा व पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

एमपीसी न्यूज – भारतीय हवामान विभागाकडून सातारा व पुणे या जिल्ह्यांना आज मंगळवारी (दि. 9) रेड अलर्ट (Red Alert) म्हणजेच अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना सोमवारी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा व पुणे जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क (Red Alert) राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईलवर सचेत ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश दिला आहे. नदीकाठी/ दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे. नदीनाल्याच्या पूलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पर्यटनस्थळी धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इ. ठिकाणी जाण्याचे टाळावे.

Today’s Horoscope 9 July 2024 : आजचे राशीभविष्य

वीज चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच अतिवृष्टी दरम्यान जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 1077 हा असून यावर संपर्क साधावा. असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

हवामान विभागाने मंगळवारी अति मुसळधार पावसाचा (Red Alert) इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. मात्र मंगळवारी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर