एमपीसी न्यूज -देशाचे पंतप्रधान दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून रशियाची राजधानी मॉस्को शहरात आज (दि.9 जुलै) रोजी मोदींनी भारतीयांना संबोधित(Russia Tour) केलं. भारतीयांशी संवाद साधताना मोदींनी सिर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी.. अशी साद घालत भारतीयांची मने जिंकली. त्यानंतर रशियातील क्रेमलिन येथे आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात पंतप्रधान मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’ हा रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हस्ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले आहे की, “मला मिळालेला पुरस्कार हा भारतातील 140 कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे”.
Pimpri : पिंपरी चिंचवडमध्ये कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव साजरा
भारत आणि रशिया यांच्यात विशेषाधिकार आणि विशेष प्राप्त रणनीतीक करार तसेच भारत आणि रशियातील सौहार्दपूर्ण संबंधाला अधिक प्रमाणात सुदृढ आणि बलवान करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार(Russia Tour) प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरणावेळी मोदी आणि पुतीन यांची गळाभेट झाली.