Explore

Search
Close this search box.

Search

May 23, 2025 3:43 pm

MPC news

Talegaon Dabhade :अल्पवयीन वाहन चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, 1 लाख 90 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज- तळेगाव शहरात अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी एकूण 19 मुलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुण्यातील कल्याणी नगर येथील हिटअँड रन (Hit & Run)अपघात प्रकरणानंतर तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्याप्रकरणी ही कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यापासून तळेगाव शहरातील वाहतूक विभागाचे सर्व कर्मचारी व अधिकारी हे अलर्ट झाले असून कठोर कारवाई करत आहेत.

Red Alert : मुंबई-कोकणासह सातारा व पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

तळेगाव दाभाडे पोलीस वाहतूक विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ पिचड, नागनाथ लकडे,हवालदार अनंत रावण,प्रकाश काळंगे,दीपक काठे, ज्योती सोनवणे नाईक सुरेश ढवळे,लक्ष्मण मुठे हे वेगवेगळ्या भागांमध्ये वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी उपाययोजना करत आहेत. त्यातच अल्पवयीन वाहन चालकांवर आणि त्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. तरीही काही अल्पवयीन मुले पालकांची नजर चुकवून दुचाकी गाड्या बिन बोबाटपणे चालवत आहेत.

तळेगाव शहरात आणि शहर परिसरातील महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठा सहभाग असून बहुतेक अल्पवयीन मुले महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी दुचाकीचा वापर करीत असतात. त्यातूनच वेगात वाहन चालवल्याने अचानकपणे अपघात होण्याची भीतीही मोठ्या प्रमाणावर असते. याला न जुमानता अल्पवयीन मुले, पालक हे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अपघाताचा धोका संभवत असतो म्हणून अशा अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करावी व अपघात टाळावे अशी नागरिकांची मागणी होती. दैनिक पुढारीने याबाबत पुण्यातील कल्याणी नगर येथील हीट अँड रन अपघात प्रकरणानंतर तळेगाव दाभाडे वाहतूक पोलीस विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार वाहतूक पोलीसांनी ही कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर