सेजल मोईकर ही विद्यार्थिनी सुदवडी गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. ती इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या इंद्रायणी जिमची ती खेळाडू असून तिने अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथे पार पडलेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत तिने 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून तालुक्याचे नाव जगात उज्ज्वल(Talegaon Dabhade)केले आहे.
तिला या स्पर्धेसाठी इंद्रायणी जिमचे प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार विजेते नितीन वसंत म्हाळस्कर यांचे मार्गदर्शन मिळाले. सेजल ही इंद्रायणी जिमची व सुदवडी गावची पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. संभाजी मलघे, गोरख काकडे, क्रिडा शिक्षक प्रतिभा डंबीर यांनी तिला या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.