Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 1:26 am

MPC news

Today’s Horoscope 9 July 2024 : आजचे राशीभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. आजचा दिवस – मंगळवार. तारीख – 09 जुलै 2024 (Today’s Horoscope 9 July 2024)

शुभाशुभ विचार- 19 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- विनायक चतुर्थी.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – आश्लेषा 7.53 पर्यंत नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क 7.53 पर्यंत नंतर सिंह.

—————————–

मेष- ( शुभ रंग- राखाडी)

उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. नोकरीत बदल करण्याची इच्छा असणाऱ्यांना मनजोगत्या संधी चालून येतील. आजारी व्यक्ती ठणठणीत बऱ्या होतील.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी)

नोकरदारांना आज कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करावासा वाटेल. कलेच्या क्षेत्रात असणाऱ्यांना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणीसाठी आज व्यस्त दिवस.

मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. तुमची मानसिक शांती भंग करणाऱ्या काही घटना घडण्याची शक्यता आहे. आज घराबाहेर शक्यतो वादविवाद टाळावेत.

कर्क ( शुभ रंग- चंदेरी)

तुमच्या खिशात पैसा खेळता राहील. धंद्यातील काही येणे अनपेक्षित पणे वसूल होण्याची शक्यता आहे. आज कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव पडेल.

सिंह ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही प्रचंड सकारात्मकतेने घराबाहेर पडणार आहात. कोणत्याही विषयावरील चर्चा वादविवाद यात तुम्ही अग्रेसर असाल. इतरांचेही ऐकायची तयारी ठेवा.

कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा आहे. पैशाअभावी रखडलेल्या काही योजना पुन्हा कार्यान्वित करू शकाल. आज तुम्हाला मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.

Pune : पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी) (Today’s Horoscope 9 July 2024)

आज तुम्ही रिकामटेकड्या गोष्टींवर अजिबात विचार न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आज उत्साही दिवस असून कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल.

धनु (शुभ रंग- पांढरा) 

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश आहेतच असा गैरसमज नकोच. कामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करू नका मर्यादित रहा.

मकर (शुभ रंग- जांभळा)

अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करतानाही कायद्याचे भान ठेवा. सदैव सतर्क रहा.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

आज फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. वैवाहिक जीवनात जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणणे हिताचे राहील.

मीन (शुभ रंग- जांभळा)

नोकरीत वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गाला कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालावे लागेल. कार्यक्षेत्रात आज ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहेत.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर