Alandi: नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (MTS) सन 2023 – 24 स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन(Alandi) केले.
सदर परीक्षेमध्ये इयत्ता नववीतील भक्ती रविकांत राऊत या विद्यार्थिनीने 133, प्रणव निळोबा शिंदे या विद्यार्थ्याने 131 तर सुजित विठ्ठल जोरी या विद्यार्थ्याने 128 गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळविले. तसेच तालुका पातळीवर आवधूत दत्तात्रय पठारे या विद्यार्थ्याने 124, सायली अमोल पराये 122 गुणांनी चमकले असून शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. तर 6 विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी पात्र(Alandi) ठरले.
Chinchwad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांना अटक
या सर्व यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांचे व समन्वयक तसेच मार्गदर्शक शिक्षक संजय कंठाळे यांचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, किसन राठोड, अनिता पडळकर, गुणवत्ता वाढ व विकास समितीचे प्रमुख नारायण पिंगळे, सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच,यावेळी 9 विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, समन्वयक संजय कंठाळे, गुणवत्ता वाढ व विकास समितीचे प्रमुख नारायण पिंगळे समवेत प्रमोद कुलकर्णी, स्वप्नील रंधवे, संगीता पाटील, बाळासाहेब भोसले, अरविंद शिंदे आदी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.