एमपीसी न्यूज – कुरियर कंपनीचे कार्यालय फोडणारी टोळी चिखली पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीने चिखली परिसरातील कुरिअर कंपनीची दोन कार्यालय फोडून चोरी केली होती. आरोपींकडून चार लाख 39 हजार रुपयांचा ऐवज जप्त(Chikhali) केला आहे.
आदर्श दयानंद मोरे (वय 25, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव), आनंद पोपट गादेकर (वय 34, रा. अवधुत सोसायटी, पिंगळे चौक, चिखली), प्रदिप दिलीप तांबोळी (वय 25, रा. भाटेवस्ती, तळवडेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाडो फॅक्स टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कुरियर कंपनीचे आंगणवाडी रोड, मोरेवस्ती चिखली येथील ऑफिस 1 जुलै रोजी फोडण्यात आले. चोरट्यांनी एक लाख सात हजार 244 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरून नेला. मन्नु रामबचन यादव (वय 29, रा. आंगणवाडी रोड मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पुन्हा 5 जुलै रोजी टॉवरलाईन, सहयोगनगर, तळवडे येथील डिलेवरी लिमीटेड कंपनीचे कार्यालय फोडून आतील एक लाख तीन हजार 384 रुपयांची रोकड व ऑफीसमधील 15 हजार 858 रुपयांचे कुरियरचे पार्सल चोरून नेले. सचिन पांडुरंग जढर (वय 25, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी फिर्याद दिली. वरील दोन्ही गुन्हयातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत सारखीच होती.
Chikhali : कुरिअर कंपनीचे कार्यालय फोडून रोख रकमेसह कुरिअरचे पार्सलही लंपास
गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाच्या परीसरातील 100 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेजची तपासणी करीत आरोपींचा माग काढला. त्यानुसार तीनही आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींनी चोरलेला मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी असा मिळून चार लाख 39 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत(Chikhali) केला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त संदीप हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे, उपनिरीक्षक राजेश मासाळ, अंमलदार संदिप मासाळ, सुनिल शिंदे, अमोल साकोरे, चेतन सावंत, बाबा गर्जे, दिपक मोहिते, सुरज सुतार, कबीर पिंजारी, संदीप राठोड, गौतम सातपुते, संतोष भोर, संतोष सकपाळ यांच्या पथकाने केली.