Explore

Search
Close this search box.

Search

May 23, 2025 5:38 pm

MPC news

Pune :राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात बिबट्या शिरला; जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात केली रवानगी

एमपीसी न्यूज – गेल्या काही महिन्यांपासून खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्याचं वास्तव्य मानवी वस्तीमध्ये वाढताना पाहायला मिळत आहे.अशातच राजगुरुनगर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयामध्ये चक्क बिबट्या शिरला असल्याची घटना समोर आली असून या घटनेने तिथे काम करणाऱ्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला आहे. तसेच  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील(Pune) व्हायरल झाला आहे.

राजगुरुनगरजवळ असलेल्या चांडोली परिसरात महावितरणचे कार्यालय आहे. या कार्यालयात आज सकाळच्या वेळेस अडगळीच्या जागेमध्ये बिबट्या शिरला असल्याचे पाहायला मिळालं. मागच्या काही दिवसांपासून एक बिबट्या आपल्या बछड्यांसह या महावितरण कार्यालय परिसरामध्ये असल्याचं बऱ्याच लोकांनी पाहिले होते. मात्र आज दि. 10 जुलै रोजी थेट महावितरण कार्यालयामध्येच बिबट्या शिरल्याचं दिसल्याने एकच खळबळ(Pune) उडाली आहे.

Varandha Ghat : 31 ऑगस्टपर्यंत वरांधा घाट वाहतुकीसाठी राहणार बंद

या बिबट्याला महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्या रूममध्ये कोंडल्याचं पाहायला मिळालं. कार्यालयात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करून जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर