एमपीसी न्यूज – रुग्णालयात चुकीचे उपचार झाल्याने आमचा रुग्ण (Ranjangaon)दगावला, असे म्हणत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातला. डॉक्टरला चपलेने मारहाण करून त्याच्या पत्नीस मारहाण आणि गैरवर्तन करत विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथील ओंकार हॉस्पिटल मध्ये घडली.
याप्रकरणी डॉक्टरने रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुग्णाच्या पाच अनोळखी नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार राजेंद्र घोडके या रुग्णाला फिर्यादी यांच्या ओंकार हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातला. रुग्णालयात चुकीचे उपचार दिल्याने आमचा मुलगा मयत झाला, असे म्हणत एका महिलेने फिर्यादी यांना चपलेने मारले.
Talegaon: तळेगाव-चाकण मार्गावर हिट अँड रन; महिलेला चिरडून वाहन चालक पसार
त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या पत्नीसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. एकाने फिर्यादी डॉक्टरांच्या डोक्यात डेस्कटॉप मारून त्यांना गंभीर जखमी केले. हॉस्पिटल मध्ये तोडफोड करून नुकसान केल्क्याचे फिर्यादीत नमूद आहे. रांजणगाव पोलीस तपास करीत आहेत.