एमपीसी न्यूज – जुनी सांगवी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जयसिंहराव पवार (Sangvi)(वय 82 वर्षे) यांचे सोमवारी (दि.8) निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
प्रतिभा पवार यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला होता. त्यांना ‘आदर्श ज्येष्ठ नागरिक ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Pimpri : जाधववाडी-चिखलीत होणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारत
दैनिक इंडियन एक्स्प्रेस -लोकसत्ता मध्ये चीफ जनरल मॅनेजर, डीएनए समूहामध्ये व्हाइस प्रेसिडेंट -कार्पोरेट तसेच पुढारी वृत्त समूहामध्ये कंट्री हेड मार्केटिंग या उच्च पदांचा कार्यभार सांभाळलेले आणि काही काळ पुण्यनगरी ग्रुपचे सल्लागार राहिलेले संजय पवार यांच्या त्या आई होत.