Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 6:55 am

MPC news

Lonavala : श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दीपक हुलावळे तर उपाध्यक्षपदी मारुती देशमुख

एमपीसी न्यूज :महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला – वेहेरगाव गडावरील श्री आई एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी कार्ला गावातील दीपक निवृत्ती हुलावळे यांची तर उपाध्यक्षपदी देवघर येथील मारुती रामचंद्र देशमुख व सागर देवकर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. यासह देवस्थान ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची निवड करण्यात आली. सचिवपदावर देवीचे मुख्य पुजारी असलेले नवनाथ देशमुख, खजिनदारपदी देवीची दैनंदिन पूजा अर्चा करणारे संजय गोविलकर, सह सचिव पदी महेंद्र देशमुख, सहखजिनदारपदी विकास पडवळ यांची एकमताने निवड (Lonavala) करण्यात आली.

मागील अनेक वर्षांपासून आई एकवीरा देवस्थानचा कारभार शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली चालू होते. मागील वर्षी याठिकाणी सात विश्वस्तांनी निवड झाली होती तर मागील आठवड्यात भविकांमधून दोन विश्वस्त निवड करण्यात आली होती. या नऊ विश्वस्तांमधून आज पदाधिकारी निवड करण्यात आली. यानंतर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये या निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा देणे व भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे याकरिता विश्वस्त मंडळ काम करेल. तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून याठिकाणी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आराखडा येथील नूतन विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या समोर ठेवण्यात येईल व त्यानुसार विकास कामे केली जातील. विश्वस्त मंडळाला सोबत घेऊन येथील विकास केला (Lonavala) जाणार आहे.

Pune :राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात बिबट्या शिरला; जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात केली रवानगी

निवडीनंतर बोलताना, दीपक हुलावळे व सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले, विकास आराखड्यानुसार कामे होणार असली तरी आजमितीला येथे येणाऱ्या भाविकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नवनाथ देशमुख व मारुती देशमुख म्हणाले, मागील वर्षभरापासून अनेक अडचणींमुळे निवडणूक लांबणीवर पडत होती. गडावर येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी विश्वस्त मंडळ अस्तित्वात येणे गरजेचे होते. मागील काळात भाविकांची झालेली गैरसोय सर्वश्रुत आहे. यापुढे भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य दिले जाईल. विकास पडवळ व सागर देवकर म्हणाले, आई एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देवीची व भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा उपयोग करत भाविकांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर