एमपीसी न्यूज – आळंदी येथील धाकडी पादुका जवळील पेट्रोल पंपा समोर,आळंदी पुणे रस्त्यावर एका चेंबरचे पत्र्याचे झाकण दुरावस्थेत आहे. त्यावरून वाहने जाऊ नये यासाठी चेंबर शेजारी बॅरिगेट लावले आहे. परंतु त्या बॅरिगेट मुळे त्या भागात रस्ता अरुंद पडत आहे.
वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच त्या रस्त्यावरून जड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते व त्या ठिकाणावरील चेंबर च्या झाकणा वरून जड वाहनांचे चाक गेल्यास तेथील चेंबरचे झाकण वेळोवळी तुटते ,खराब होते. यामुळे सतत तिथे वाहनांना अडथळा निर्माण होतो. यामुळे प्रशासनाने याची दखल घेत त्या ठिकाणी परत अशी समस्या उदभवू नये यासाठी योग्य ती उपाय योजना करावी.