एमपीसी न्यूज – विक्रीसाठी तंबाखू व गुटखा जवळ बाळगल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात (Kiwale Gaon)आली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा 5 च्या पथकाने बुधवारी ( दि. 10) किवळे गाव येथे केली आहे.
शकरलाल मांगीलाल देवासी (वय 20 रा. किवळे) याला अटक केली आहे.याप्रकरणी रावेत पोवीस ठाण्यात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांनी फिर्याद दिली आहे.
Hinjawadi : कारने कुत्र्याच्या पिल्लाला चिरडले, कार चालका विरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय फिर्यादी हा त्याच्या ताब्यात तंबाखू, गुटखा, सुगंधी सुपारी असे साहित्य विक्रीसाठी बाळगून होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून 13 हजार 326 रुपयांचा गुटखा जप्त केला. रावेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.