Explore

Search
Close this search box.

Search

March 25, 2025 2:26 pm

MPC news

Maval : यांत्रिक पद्धतीने भात लागवडीस शुभारंभ

एमपीसी न्यूज – भात लागवड करण्यासाठी देखील यांत्रिक पद्धत वापरली जात आहे. मावळ तालुक्यातील यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचा शुभारंभ मावळ तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या हस्ते वडेश्वर येथे संपन्न झाला.

मावळ तालुका हा भाताचे आगार असलेला तालुका असून या तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. पारंपारिक पद्धतीने होणारी ही लागवड यापेक्षा यांत्रिक पद्धतीने करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केली आहे.

Today’s Horoscope 11 July 2024 : आजचे राशीभविष्य

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पिकाचे उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीचा व यांत्रिक पद्धतीने लागवड करावी असे आवाहन कृषी अधिकारी पडवळ यांनी केले आहे.

यांत्रिक पद्धतीने भात लावणी करण्याचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी वडेश्वर गावातील वाघमारे यांच्या शेतावर केला. यावेळी मंडल कृषी अधिकारी राजाभाऊ गायकवाड, कृषी पर्यवेक्षक नवीन बोराडे, घनश्याम दरेकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, तुकाराम लष्करी, शेतकरी नामदेव खांडभोर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर