एमपीसी न्यूज – संत तुकाराम नगर, पिंपरी येथील मेट्रो स्टेशनच्या पाय-या उतरत असताना एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
आदित्य सुरेश रावडे (रा. दत्त मंदिरजवळ, रावडेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हिरासनगर, पिरंगुट येथे राहणा-या 20 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 10) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Hinjawadi : कारने कुत्र्याच्या पिल्लाला चिरडले, कार चालका विरोधात गुन्हा दाखल
पोसिांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सोमवारी सकाळी संत तुकाराम नगर, पिंपरी येथील मेट्रो स्टेशनच्या पाय-या उतरत होत्या. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी आदित्य हा फिर्यादी तरुणीस म्हणाला की माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणत तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणीने त्यास विरोध केला. आरोपीने फिर्यादी यांचा चोरून पाठलाग केला. तसेच तू आणि तुझे कुटुंब पुणे जिल्हा सोडून निघून जा नाहीतर मी तुम्हाला बघून घेईल, असा दम दिला. हा गुन्हा पौड पोलीस स्टेशनकडून पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.