एमपीसीन्यूज -पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर(Pune) आली आहे. शाळा सुरु होऊन एक महिना झाला असून शिक्षण विभागाने 49 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.
या 49 शाळा इंग्लिश माध्यमांच्या असून पुणे शहर आणि ग्रामीण भागतील 45 शाळा या बेकायदेशीर असून 4 शाळा या नियमबाह्य पद्धतीनं चालत आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित शाळांवर कारवाई करत त्या शाळांना नोटिसी बजावल्या आहेत. तसेच या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत रवानगी केली जाणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
संतोष पाटील म्हणाले की , “पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या 49 अनधिकृत शाळा आहेत. जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील सर्व शाळांचं सर्वेक्षण केल जातं आहे. ज्या शाळांना मान्यता नाही, त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येत आहे. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून 45 शाळा या बेकायदेशीर असून 4 शाळा नियमबाह्य आहेत. ज्या शाळांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्यांनी जर नोटीस बजावून देखील शाळा सुरू ठेवल्या तर शाळेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यानंतर जर शाळा सुरू राहिली, तर प्रतिदिन 10 हजार रुपये असा दंड केला जाणार आहे. एवढंच नव्हे, जर कारवाई करुन सुद्धा शाळा बंद केल्या नाहीत तर फौजदारी गुन्हा देखील दाखल होणार आहे.”
Pune :सावित्रीबाई फुले विद्यापीठात भरड धान्यावर एकदिवसीय कार्यशाळा
यामध्ये ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, (उंड्री), किड्जी स्कूल, (दौंड, ), अभंग शिशु विकास (कासुर्डी),यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल (सोनवडी),नारायणा इ टेक्नो स्कूल (वाघोली), द गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल ( ता. हवेली, जि. पुणे.) ,फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल (मांजरी बु.),इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल (फुरसुंगी), व्ही. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल (भेकराईनगर), द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल (कदम वाकवस्ती, ), रामदास सिटी स्कूल रामदरा (लोणी काळभोर), श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय (कुंजीरवाडी), शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल (जांभुळवाडी), भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (मोई), जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल (खामशेत), श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर (गहुंजे) सह इतर शाळांचा समावेश आहे.