Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 8:16 am

MPC news

Pune :पूजा खेडकर यांच्या नियुक्तीची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून एकसदस्यीय समिती स्थापन

एमपीसी न्यूज -प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडली असून पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावल्याने एकच खळबळ(Pune) उडाली आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या नियुक्तीची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एकसदस्यीय समिती स्थापन केली आहे, असे सूत्रांकडून समजते.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, पूजा खेडकर यांची युपीएससी परीक्षेतून निवड झाली असून सध्या त्या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.पुण्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असताना त्यांनी विनापरवाना स्वतःच्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला.

पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्याबद्दल पुणे  पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 177 अन्वये कायदेशीर कारवाई केलेली असून त्यांच्या संबंधित वाहनावर पूर्वीचे देखील वाहतूक नियम भंगाबाबत दंडात्मक(Pune) कारवाई झालेली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चतुश्रुंगी वाहतूक विभागाने पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार(MH 12 AR 7000) कायदेशीर तपासणीकरिता कागदपत्रांसह चतुश्रुंगी वाहतूक विभाग येथे हजर करावी, असा समज दिला आहे. तसेच त्यांनी वापरलेल्या संबंधित ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड सुद्धा आकारण्यात आला आहे.

Pune : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात; पुणे पोलीस करणार कारवाई

तसेच,

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर