एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘भरड धान्य आणि त्यांचे मानवी आहारातील महत्त्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वनस्पतीशास्त्र विभागांतर्गत कार्यान्वित असणाऱ्या सेंटर फॉर मिलेट रिसर्च अँड ट्रेनिंग केंद्राच्या वतीने ही कार्यशाळा घेण्यात(Pune) येत आहे.
या कार्यशाळेचे उद्धाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी बायफ रिसर्च फाउंडेशन, पुणेचे प्रकल्प समन्वयक श्री. संजय पाटील, स्वग्राम संस्थेचे संतोष सुर्यवंशी वैद्य, एच. पी. टी. आर्ट्स आणि आर. वाय. के. सायन्स कॉलेज, नाशिकचे प्राध्यापक डॉ. संजय औटी, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. बी. नादाफ, कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. हेमलता कोटकर, आदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात13 जूलै रोजी होणाऱ्या या कार्यशाळेत भरड धान्याची ओळख, लागवड, संगोपन, उत्पादन आणि प्रक्रिया या विषयांवर चर्चा करण्यात येणार(Pune) आहे.
Pune : राजगुरुनगर येथील वीज कार्यालयात बिबट्याला जेरबंद करणाऱ्या महिलेचा सत्कार
या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.
https://forms.gle/41VdGZd8CEiRCSXu8