एमपीसी न्यूज – काल दि.(10 जुलै) रोजी राजगुरुनगर येथील चांडोली गावातील वीज कार्यालयामध्ये बिबट्या लपून बसल्याची घटना समोर येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असल्याची वार्ता समोर आली होती.मात्र,चांडोली गावातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांनी वेळीच तत्परता दाखवत बिबट्याला एका खोलीत जेरबंद केले. त्यांच्या या धाडसी कृत्याचे कौतुक सर्व स्तरातून होत असून त्यांनी केलेल्या या अतुलनीय कार्यामुळे आज दि.(11 जुलै) रोजी पुणे झोनचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार(Pune) करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील चांडोली गावातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके नेहमीप्रमाणे आपल्या टेबलावर काही मीटर चाचणी घेत असताना लाइनमन बाळू फणसे यांनी त्यांना वारंवार हाक मारल्याचे ऐकले. पण फणसे यांना उत्तर देण्याआधीच त्यांना काहीतरी चुळबुळत असल्याचा आवाज आला आणि त्यांनी मागे पाहिले असता बिबट्या एका टेबलाखाली जाऊन बसलेला पाहायला मिळाला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी काम करत असताना मला समजलेच नाही की, बिबट्या कधी खोलीमध्ये येऊन बसला आहे.मी घाबरले होते, पण आपल्या विवेकबुद्धीचा वापर करत मी चाचणी कक्षाबाहेर जाऊन दरवाजा बंद केला आणि बिबट्याला कोंडून ठेवले.
Pune :राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात बिबट्या शिरला; जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात केली रवानगी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांनी वेळीच आरडाओरडा न करता परिस्थिती हाताळल्याने स्वतःचे प्राण तर वाचवलेच पण इतरांचे देखील प्राण त्यांनी वाचविले. याअनुषंगाने त्यांचा आज पुणे झोनचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार(Pune) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
राजगुरुनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप राऊंढाळ यांनी सांगितले की, सकाळी अकराच्या सुमारास महावितरणच्या मीटर चाचणी कक्षात बिबट्या घुसल्याची माहिती मिळाली. जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक व वन्यजीव बचाव पथक रवाना करण्यात आले.चार ते पाच वर्षांच्या बिबट्याला इंजेक्शन देण्यासाठी पथकांनी डार्टचा वापर करून त्याला शांत केले. त्यानंतर या प्राण्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रात नेण्यात आले.