एमपीसी न्यूज – मुलगी लहान असतानाच तिच्या आई-वडिलांना विश्वासात (Rajasthan)न घेता तिचा विवाह ठरवला. मात्र मुलीच्या आई-वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. तरी देखील मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर लग्नासाठी दबाव आणत संपूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत माहिती अशी की, राजस्थान मधील लोहारवा येथील एका तरुणीने याबाबत आपली कैफियत मांडली आहे. तरुणी बाल्यावस्थेत असताना रामजीवन उर्फ धोलिया जागू आणि त्याचे वडील किशनराम जागू यांनी मुलीच्या घरी जाऊन तिचा रामजीवन याच्यासोबत विवाह ठरवला. मात्र हा विवाह मुलीच्या आई-वडिलांना मान्य नव्हता. यानंतर मुलगी आणि तिचे कुटुंबीय कधीही रामजीवन याच्या घरी गेले नाहीत. अथवा त्यांच्याशी संबंध ठेवला नाही.
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर रामजीवन, त्याचे वडील किशनराम जागू, नातेवाईक हरदानराम भादू, कोजा बाबू, किशनराम जागू राजू, किशनराम जागू सुरेश, किशनराम जागू रामचरण, किशनराम जागू श्रवण, वीरधाराम ढाका, कालूराम ढाका, कालूराम डारा यांनी मुलीच्या आई वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. मुलीचा विवाह रामजीवन याच्यासोबत लावून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला.
Pune : राजगुरुनगर येथील वीज कार्यालयात बिबट्याला जेरबंद करणाऱ्या महिलेचा सत्कार
पीडित मुलीच्या वडिलांचा व्यवसाय आहे. मुलगी वडिलांच्या दुकानात बसली असताना रामजीवन आणि त्याच्या नातेवाईकांनी मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. तसेच मुलीचा विवाह रामजीवन याच्यासोबत लावून न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. सतत होणाऱ्या या त्रासाला संपूर्ण कुटुंब त्रासले आहे.