Explore

Search
Close this search box.

Search

May 15, 2025 2:15 am

MPC news

Ravet : कॅफेच्या आड अश्लिल चाळ्यांना मुभा देणाऱ्या कॅफेवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – परवानगी नसताना कॅफे चालवून तिथे तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यास मुभा देणाऱ्या कॅफेवर (Ravet)रावेत पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) रावेत येथील नॉकनॉक कॅफे येथे करण्यात आली आहे.

कुणाल पांडुरंग राळे (वय 21 रा.भोसरी) याच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : मेट्रो स्टेशनवर तरुणीचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्याकडे कॅफे चालवण्याचा कोणताही परवाना नसताना तो नॉक-नॉक कॅफे चालवत होता. त्यामध्ये बाहेरच्या बाजूने पडदे लावून तेथे तरुण-तरुणींना अश्लील चाळे सुरु होते. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर