एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांचे सोमवारी (दि. ८) निलंबन झाले. निलंबनानंतर तळेगावकर नागरिकांनी नगरपरिषदेच्या समोर येऊन फटाके फोडले व पेढे वाटप करून शासनाला धन्यवाद देत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा शैलजा काळोखे, संध्या थोरात, नीलिमा गुंजाळ, उषा शिळीमकर, विद्या शिळीमकर, कलिका घुले, रिद्धी गांगुर्डे, लीना दिघे, लीलावती मेंगडे, संध्या देसाई, प्रिया मोडक, रश्मी जगदाळे, गोकुळ किरवे, नवनाथ कुल आदीजण उपस्थित होते.
Today’s Horoscope 11 July 2024 : आजचे राशीभविष्य
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांचा राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सोमवारी निलंबनाचा आदेश काढला.
श्री पाटील यांच्यावर मद्य प्राशन करून वाहन चालविणे तसेच नगरपरिषदेच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करण्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले.
पाटील यांना निलंबित करण्यात आले. हे वृत्त तळेगाव शहरात नागरिकांना समाज माध्यमांच्या माध्यमातून समजले. नागरिकांनी मंगळवारी (दि. ९) नगर परिषदेसमोर जाऊन फटाके फोडून पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.