Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 10:22 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Today’s Horoscope 11 July 2024 : आजचे राशीभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. आजचा दिवस – गुरुवार. तारीख – 11 जुलै 2024 (Today’s Horoscope 11 July 2024)

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – 13.04 पर्यंत पूर्वा फाल्गुनी नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 19.49 पर्यंत नंतर कन्या.

—————————–

मेष- ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल. स्वप्नपूर्ती होईल.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

महत्त्वाच्या चर्चेत आज विरोधक नमते घेतील. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे. गृहिणी आज बचतीला प्राधान्य देतील.

मिथुन (शुभ रंग – पिस्ता)

ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. काही अति हुशार मंडळी भेटतील. आज कमीच बोला.

कर्क ( शुभ रंग- क्रीम)

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठबस आनंदाने कराल.

सिंह ( शुभ रंग- भगवा)

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा संभवतो.

कन्या (शुभ रंग- हिरवा)

मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष द्या, परमार्थ परवडणारा नाही. घरात वडीलधारी मंडळी हट्टीपणाने वागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ (शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून काही महत्त्वाचे समाचार येतील.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी )

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करू शकाल. हाताखालच्या माणसांवर तुमचा अंकुश राहील. आज विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देता येतील.

धनु (शुभ रंग- निळा) 

नोकरीच्या ठिकाणी आज कितीही राबलात तरी साहेबांचे समाधान होणे शक्य नाही. नास्तिक मंडळी ही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील. दैव मात्र तुमच्या बाजूने आहे.

मकर (शुभ रंग- जांभळा)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल दिवस असून नोकरीतही वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड होईल. कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)

व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्न साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकीय तुमच्या शब्दाला मन देतील. महत्त्वाची कामे आज दुपार पूर्वी उरकून टाका.

मीन (शुभ रंग- आकाशी)

आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर आज नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

शुभम भवतु.

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर