एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे. चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक 2/92 शाळेसाठी आरक्षीत असलेला भूखंडाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने मागे घेतला. संबंधित जागा खासगी संस्थेला देण्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या खासगीकरण प्रक्रियेला तीव्र विरोध(Charholi) केला होता.
चऱ्होलीतील संबंधित शाळा आरक्षणावर खासगी संस्थेद्वारे शैक्षणिक इमारत उभारण्याबाबत महापलिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती. तसेच, निविदा प्रक्रियाही सुरू केली होती. यावर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, मौजे चऱ्होली आरक्षण क्रमांक 2/ 92 मधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये प्रशासनाने क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) विकसित करावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाला(Charholi) केली होती.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 मध्ये नव्याने गावे सामाविष्ट झाली. त्यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी या गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी 2017 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. आता आरक्षण असताना, त्या ठिकाणी खासगी संस्थांद्वारे शैक्षणिक संकूल उभारण्यापेक्षा महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्कूल सुरू केल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.
MSRTC : प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
दरम्यान, खासगी संस्थेला सदर भूखंड वापरण्यास व शाळा बांधण्यास प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, समाविष्ट गावांतील 20 वर्षांचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्याच्या दृष्टीने सदर भूखंड खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला माझा तीव्र विरोध आहे. सदर कार्यवाही तात्काळ रद्द करावी, अशी आग्रही मागणी केली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार सदर निविदा प्रक्रिया रद्द केली आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना आमदार लांडगे म्हणाले, समाविष्ट गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात विकासाला चालना देण्यात आली. त्यामुळे ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला आहे. लोकसंख्या आणि गृहप्रकल्प वाढले आहेत. स्थानिक खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे आणि हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे. या करिता महापालिका प्रशासनाने चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक 2/92 याठिकाणी क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) सुरू करावे, अपेक्षा आहे.