Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 11:12 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Chinchwad : सांगवीतील फसवणुकीचे दुबई कनेक्शन उघड; महिलेची 18 लाखांची फसवणूक करणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज – ट्रेडिंगच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची 18 लाख 12 हजार 436 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 23 मार्च ते 27 मे या कालावधीत सांगवी परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडली. महिलेची फसवणूक करून आरोपींनी युएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी खरेदी केली. या प्रकरणातील तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली. त्यांचे दोन साथीदार दुबई येथे असून या फसवणूक प्रकरणाचे दुबई कनेक्शन उघड(Chinchwad) झाले आहे.

अश्वीन शेट्टी ऊर्फ अश्वीन नारायण शेरगर (रा. मिराभाईंदर, जि. ठाणे), विरेंद्र राजेंद्रप्रसाद राय (वय 32, रा. भाइंदर, जि. ठाणे), नसीर अब्दुल सय्यद (वय 36, रा. मिरारोड ईस्ट, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे(Chinchwad) आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेने फेसबुकवर शेअर ट्रेडींगबाबत आलेल्या जाहीरातीमधील लिंक ओपन केली असता महीलेस एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्यानंतर तिला त्यांचे बनावट ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतंवणुक केल्यास 25 ते 30 टक्के प्रॉफिट मिळवून देण्याचे अमिष दाखवून वेगवेगळ्या बँकेच्या अकाऊंटला एकूण 18 लाख 12 हजार 436 रुपये भरण्यास भाग पाडले. तसेच त्या रकमेतून युएसडीटी डॉलर घेत महिलेस तिने गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता सदर रक्कमेचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात आला. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्याची माहिती काढली असता अश्वीन शेट्टी या इसमाने फसवणुकीच्या रकमेतून युएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी विकत घेतली आहे. तांत्रिक तपासात तो व्यक्ती मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायबर सेलंच्या पथकाने ठाणे येथे जाऊन आश्विन, वीरेंद्र आणि नसीर या तिघांना अटक केली. त्या तिघांनी त्यांच्या सलमान व अभि (पूर्ण नाव माहिती नाही. रा. दुबई) साथीदारांसह मिळून केला असल्याची कबुली दिली. आरोपींकडून 4 लाख रुपये रोख रक्कम आणि सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

Pimpri Chinchwad : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची दिशाभूल आणि अडवणूक होत असल्याचा आरोप

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, दिपक भोसले, सचिन घाडगे, अभिजीत उकिरडे, अशोक जवरे यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर