एमपीसी न्यूज -विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आतापर्यंत 270 आमदारांनी मतदान केलं असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. पुढच्या काही तासांत निकाल लागणार(MLC) आहे.
लोकसभा निवडणुकानंतर राज्यात मोठी निवडणूक होत असून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रणांगणात आहेत. तसेच, आज सकाळपासून निवडणूक आयोगाच्या निगराणीत मतदान सुरू झालं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली असून कोण जिंकणार आणि कोण हरणार याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. आपापली मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी क्रॉसव्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेतली असून आपल्या आमदारांची गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक पक्षाने आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये रवाना केले असून त्यांची विशेष काळजी घेत असल्याचे)MLC) समजते.