Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 7:58 am

MPC news

Pune : किराणा दुकानदाराकडून बेकायदा बंदूक हाताळताना गोळीबार, एक जण जखमी

एमपीसी न्यूज – बेकायदा बंदूक बाळगून ती हाताळत असताना गोळीबार झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात गुरुवारी (दि.11) सकाळी घडली. 

वडगाव बुद्रुक परिसरात चरवड वस्तीत एका किराणा माल दुकानदारने बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगले होते. गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास किराणा माल दुकानदार त्याच्या मित्राला पिस्तूल दाखवित होता. पिस्तूल हाताळताना चाप ओढला गेल्याने गोळी सुटली आणि गोळी मित्राच्या पायाला चाटून गेली. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.

गोळीबाराची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.गोळीबारात एकाच्या पायाला गोळी चाटून गेली आहे. गोळीबार नेमका कसा झाला, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली.

Click Here to Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर