एमपीसी न्यूज -सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.13) रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून पंतप्रधानांनी मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचं म्हटलं. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न असल्याचं मोदींनी(Mumbai) म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आज मुंबईत स्वागत केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही आपल्या शैलीत भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचं म्हटलं.
Pimpri : विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाबद्दल भाजपकडून “आनंदोत्सव”
पुढे बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटले की, महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत मोदींनी आपल्या खुमासदार भाषणाची सुरुवात केली. येथील 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होत असून राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा लोकांनी आमचं स्वागत केलं असून एनडीए सरकारचं स्थिरता देऊ शकते हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पटीने अधिक काम करणार आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास असून मला मुंबईला देशाची नव्हे तर जगाची आर्थिक राजधानी बनवायचे आहे, असे पंतप्रधानांनी(Mumbai) सांगितले.