या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अर्चना वर्टीकर व सय्यद मॅडम,तसेच मान्यवरांच्या हस्ते झाले. ईशस्तवन दुर्गेश्वराच्या संघाने सादर केले.अध्यक्ष महाजन यांनी प्रास्ताविक केले तर सोनगीरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.लायन्स क्लबच्या अध्यक्षा मनीषा गायकवाड यांचा सत्कार अध्यक्ष महाजन सर, सेक्रेटरी रश्मी नायर यांचा सत्कार मुळूक सर,खजिनदार वृषाली सुरवडे यांचा सत्कार वैद्य सर यांनी केला.
सर्व शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे वाचन चंद्रशेखर जोशी, शाम खवले यांनी केले. सभासदांच्या नातवंडांचा सत्काराचे वाचन अलका बेल्हेकर वर रजनी जैन यांनी केले.उपस्थित पालकापैकी व विद्यार्थ्यांपैकी दोघांनी तसेच शिक्षकांनी मनोगत सादर केले.तसेच या कार्यक्रमाचे आभार डॉ,म्हेत्रे यांनी मानले.खाऊ वाटप अशोक विरकर, काशिनाथ पाटील, वसंतराव पाटील, वसंतराव पाटील,संकलेच्या सुनंदा कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा कोळपकर यांनी केले.