एमपीसी न्यूज – आजचे पंचांग आजचा दिवस – शनिवार. (Today’s Horoscope 13 July 2024 : आजचे राशीभविष्य)
तारीख – 13.07.2024.
शुभाशुभ विचार- 15प. चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30 .
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – हस्त 19.15 पर्यंत नंतर चित्रा
चंद्र राशी – कन्या.
—————————–
मेष- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल. आरोग्याच्या काही तक्रारी मात्र दुर्लक्षित करून चालणार नाहीत.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटण्याजोगी कामगिरी तुमच्या हातून होईल.
मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची ये जा राहील. गृहिणी स्वतःचे छंद जोपासतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृह सौख्याचा दिवस.
कर्क ( शुभ रंग- पांढरा)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील. गृहिणी शेजार धर्म पाळतील.
सिंह ( शुभ रंग- क्रीम)
धनस्थानातील चंद्रभ्रमण आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.
कन्या (शुभ रंग- भगवा)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल.
तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभाने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी )
आज हार्ड वर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल असेल. मित्रांनी केलेल्या छोट्या स्तुतीने ही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल.
धनु (शुभ रंग- जांभळा)
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष द्याल.
मकर (शुभ रंग- निळा)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती श्रद्धा होणार आहेत.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
जे चाललंय ते बरच म्हणायला हवं. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरू नका. कोणतेही अनैतिक व्यवहार टाळा. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.
मीन (शुभ रंग- गुलाबी)
वैवाहिक जीवनात सामंजस्य असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावू नका.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424