Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 10:17 am

MPC news

Chakan : पुणे-नाशिक महामार्गावर कारला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावात कारला एका दुचाकीने धडक(Chakan ) दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 18 जून रोजी घडला.

ज्ञानेश्वर सांडभोर (वय 50, रा. सांडभोरवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी महेश दादाराव पाटील (वय 26, रा. धायरी, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : वाकड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे त्यांच्या कारमधून नाशिककडून चाकणकडे येत होते. वाकी खुर्द गावच्या हद्दीत त्यांच्या कारला ज्ञानेश्वर यांनी दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर