एमपीसी न्यूज–तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे माजी अध्यक्ष,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब (नाना) रामभाऊ भेगडे (वय-74 वर्ष) यांचे आज(दि.14) रोजी अल्पशा आजाराने निधन(Talegaon) झाले.
त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे,पुतणे असा परिवार आहे.त्यांनी पिंपरी येथील केएसबी कंपनीमध्ये नोकरी पूर्ण केली.बाळा भेगडे स्नेह ग्रुपचे संस्थापक संदीप भेगडे, उद्योजक शाम भेगडे यांचे ते वडील तर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांचे ते चुलते(Talegaon) होत.