एमपीसी न्यूज – खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणे, अंबर दिवा लावणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. खेडकर यांचे प्रकरण चर्चेत आल्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरने निगडी वाहतूक विभागात येऊन हा संपूर्ण दंड(Pune) भरला.
विविध कारणांसाठी मागील काही दिवसांपासून देशभर चर्चेत असलेल्या आयएएस पूजा खेडकर यांनी त्यांच्या खाजगी ऑडी कार (एमएच 12/एआर 7000) वर पुढे, मागे महाराष्ट्र शासन असे लिहिले. तसेच वरील बाजूला अंबर दिवा लावला होता. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी या कारवर मोटर वाहन कायदा कलम 177 नुसार कारवाई करण्यात आली होती.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवर तब्बल 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. हा दंड कार चालकाने निगडी येथे जमा केला आहे. निगडी मधील भक्ती शक्ती चौकात वाहतूक पोलीस मुद्दशीर मुशीर ठाणेदार उर्फ अस्लम ठाणेदार वाहतुकीचे नियमन करत असताना कारचालक तिथे आला. त्याने ठाणेदार यांना त्याच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड असल्याचे सांगितले. त्यानंतर कारचालकाने ही दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली.निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर बाबर म्हणाले, “निगडी मधील भक्ती शक्ती चौकात वाहतुकीचे नियमन करत असताना खेडकर यांच्या ड्रायव्हरने निगडी वाहतूक विभागातील एका अंमलदाराकडे दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली(Pune) आहे