एमपीसी न्यूज – पवना धरण परिसरात मागील काही दिवसांपासून सलग पाऊस (Pavana Dam)पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा येवा वाढला आहे. मागील 24 तासात धरण परिसरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एका दिवसात तब्बल 3.94 म्हणजे जवळपास चार टक्क्यांनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
पवना धरणात रविवारी (दि. 14) 28.77 टक्के पाणीसाठा आहे. एक जून पासून पवना धरण परिसरात 662 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यात मागील 24 तासात 132 मिलिमीटर पाऊस पडला. हा या वर्षी पडलेला सर्वाधिक पाऊस आहे.
मागील वर्षी आजपर्यंत 655 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी धरणात 30.75 टक्के पाणीसाठा होता.
Mumbai : महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनावं -पंतप्रधान मोदी
यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पवना धरणात 17.43 टक्के पाणी साठा होता. त्यात आज पर्यंत 11.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के आहे.