Explore

Search
Close this search box.

Search

May 15, 2025 1:33 am

MPC news

Pune : पद्यमावती येथे चारचाकी वाहनाला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

एमपीसी न्यूज – आज (दि.14) रोजी दुपारी 2.56 वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात पदमावती येथे विणकर सभागृहाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची वर्दी मिळताच काञज अग्निशमन केंद्र(Pune) येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाच्या पुढील भागाकडे आगीच्या ज्वाळा दिसत होत्या, तर मागील बाजूस इंधनाची ही गळती होत असल्याचे पाहून त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी फोमचा वापर करुन सुमारे दहा मिनिटात पूर्ण आग विझवत धोका दूर केला. सदर वाहन हे फोर्ड कंपनीचे असून डिझेल वापरातील(Pune) आहे. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी नाही.

Pimpri : जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्याची वृत्ती हवी – चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रदिप खेडेकर, वाहन चालक गणेश भंडारे, फायरमन पंकज इंगवले, निलेश राजीवडे, अभिषेक खाटपे, योगेश कुंभार, विनायक घागरे यांनी सहभाग घेतला.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर